Home शिकू आनंदे फॅशन डिझायनिंगमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम

फॅशन डिझायनिंगमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम

0

गेल्या अनेक वर्षात फॅशन डिझाईनिंग क्षेत्रात क्रांती झालेली पाहायला मिळतेय. अनेक विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून या क्षेत्राकडे पाहण्याचा विचार करतात. म्हणूनच इंडियन फॅशन अ‍ॅकेडमी (आय. एफ. ए) यांनी नाशिक येथील संदीप विद्यापीठाच्या सहयोगाने फॅशन आणि ब्युटी या विषयातील पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. देशातील सर्वोत्तम प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या सुविधा या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

आय. एफ. ए.ची स्थापन २००१ साली झाली आणि तेव्हापासूनच फॅशन क्षेत्रात जाऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारा नावाजलेला एक अष्टपैलू (व्हर्सटाईल) ब्रँड म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ब्यूटी किंवा फॅशन क्षेत्रात पदवीधर व्हायचे आहे, त्यांच्यासाठी १२ अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

यात फॅशन आणि ब्युटी थेरपीमधील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि फॅशन व्यवस्थापन विषयातील एम. बी. ए. या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अर्हताप्राप्त आणि सक्षम कर्मचारी हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. या क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या साहाय्याने येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि अनुभव देण्यात येणार आहे. नाशिकमधील संदीप विद्यापीठात या अभ्यासक्रमासाठी २० हजार चौ. फुटांहून अधिक जागेवर सुविधा उभारण्यात आली आहे. प्रतिष्ठित एम्प्लॉयरशी संपर्क साधून देण्यासाठी ते विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत आणि कॉर्पोरेटमधील निवडप्रक्रियेसाठी त्यांची तयारी करून घेणार आहेत.

इंडियन फॅशन अ‍ॅकेडमीचे संस्थापक नितीन मगर म्हणतात, ‘देशभरात अनेक ठिकाणी फॅशन इन्स्टिटय़ूट असल्या तरी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणा-या किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणा-या संस्था अत्यंत कमी आहेत. त्यामुळेच अनेक जण फॅशन डिझायनिंग किंवा ब्यूटिशिअन या करिअरच्या वाटा चोखाळत नाहीत.’

‘फॅशन क्षेत्रात कारकीर्द घडवायची आहे त्या सर्वाना प्रशिक्षण देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. संदीप विद्यापीठाने दिलेल्या व्यासपीठाच्या मदतीने ही सुवर्णसंधी साधत आम्ही विविध अभ्यासक्रम सुरू करू. फॅशन आणि ब्यूटी क्षेत्रातील या अभ्यासक्रमांनी कल्पक प्रशिक्षण घेऊन इच्छिणा-या देशभरातील विद्यार्थ्यांना आकर्षति केले आहे’, अशी पुष्टी मगर यांनी जोडली.

अ‍ॅकेडमीमुळे या क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणारे विद्यार्थी या दोहोंनाही फॅशन आणि ब्यूटी क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमुळे भरघोस संधी मिळणार आहेत’, असे संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदीप झा म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version