Home महामुंबई फटाके फोडा, जरा जपून!

फटाके फोडा, जरा जपून!

0

फटाके फोडताना भाजणे, जखमी होण्याचे प्रकार घडत असतात. 
मुंबई– फटाके फोडताना भाजणे, जखमी होण्याचे प्रकार घडत असतात. फटाक्यांचा स्फोट होणे, फटाके अर्धवट फुटणे यामुळे दरवर्षी किमान १०० ते २०० जणांना इजा होते. त्यामुळे फटाके फोडताना काळजी घ्या, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत.

मुंबईत जागेची अडचण असल्याने अनेक जण इमारतीच्या गच्चीवर फटाके फोडतात. गच्चीवर गर्दीमध्ये फटाके फोडल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोकळया जागेत फटाके फोडावे. शक्यतो फटाके मैदानातच फोडावे. फटाके फोडताना डोळे, हात यांची काळजी घ्यावी. लहान मुले फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्या सोबत राहावे. शक्यतो पाण्याची बादली जवळ ठेवावी. तसेच शहरातील दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने धूर करणारे व मोठया आवाजाचे फटाके फोडण्यावर बंदी घालावी, असे जे. जे. रुग्णालयाचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले. गेल्या काही वर्षापासून फटाक्यांमुळे होणा-या दुर्घटनांमध्ये जखमी होणा-यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे चेह-यावर, हातावर, डोळ्यांच्या पापण्यांवर प्लॅस्टिक सर्जरी कराव्या लागतात. त्यामुळे फटाके फोडताना काळजी घ्यावी, असे नायर रुग्णालयाचे प्लॉस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. बलियार सिंग यांनी सांगितले. मोठया आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याने त्याची दखल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतली पाहिजे. रस्त्यावर आणि मध्यरात्री फोडल्या जाणा-या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले पाहिजे, असे मत काही सेवाभावी संस्थांनी मांडले आहे.

काय काळजी घ्याल?

0 फटाके फोडताना डोळे आणि हाताची विशेष काळजी घ्यावी.

0 पाण्याची बादली जवळ ठेवावी.

0 भाजल्यानंतर जखम धुवून घ्यावी आणि उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे.

0 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध वापरू नये.

गेल्या वर्षी फटाक्यांमुळे भाजलेल्यांची आकडेवारी 

जे. जे. रुग्णालय – १५५

नायर रुग्णालय – १५०

केईएम रुग्णालय – १४५

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version