Home देश प्रसूती रजेचा कालावधी वाढणार ?

प्रसूती रजेचा कालावधी वाढणार ?

0
संग्रहित छायाचित्र

नोकरी करणा-या महिलांना प्रसूती नंतर बाळाचे संगोपन करण्यास जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – नोकरी करणा-या महिलांना प्रसूतीनंतर बाळाचे संगोपन करण्यास जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

प्रस्तावित दुरुस्तीमुळे नोकरी करणा-या महिला वर्गाला तीन महिन्याऐवजी सहा महिने भरपगारी प्रसूती रजा मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार नोकरी करणा-या महिलांना कंपनीकडून बारा आठवडे म्हणजे तीन महिन्यांची कायदेशीर प्रसूती रजा मिळते.

काही आघाडीच्या कंपन्यांकडून प्रसूती झालेल्या महिला कर्मचा-यांना नियमापेक्षा जास्त रजाही मंजूर होते आणि अन्य फायदेही मिळतात. महिलांच्या प्रसूती काळातील रजेमध्ये वाढ व्हावी यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार करत असून, आमची मालक आणि कर्मचारी संघटनांसोबत चर्चा सुरु आहे असे अधिका-याने सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version