Home टॉप स्टोरी पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना आयोगाची नोटीस

पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना आयोगाची नोटीस

0

पेड न्यूज प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सोमवारी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली.

नवी दिल्ली – पेड न्यूज प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सोमवारी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. या प्रकरणी २३ मे रोजी होणा-या सुनावणीस हजर राहण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.

याआधी पाच मे रोजी पेड न्यूज प्रकरणात आयोगाच्या चौकशीविरोधात चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. तसेच चव्हाण यांच्याविरोधातील तक्रारीवर आयोगाने ४५ दिवसांच्या आत चौकशी करावी असे आदेशही दिले होते.

२००९ ची विधानसभा निवडणूक लढवणा-या अशोक चव्हाणांसाठी वर्तमानपत्रातून जाहीराती देण्यात आल्या होत्या. या निवडणूक खर्चावर त्यांच्या भोकर मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. माधव किन्हाळकर यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version