Home महाराष्ट्र पुण्यामध्ये भीषण अपघातात तीन ठार

पुण्यामध्ये भीषण अपघातात तीन ठार

0
संग्रहीत छायाचित्र

पुण्यात एका मद्यपी कारचालकाने भरधाव वेगात कार चालवत दोन दुचाकींना उडविल्याची घटना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास निगडी जकात नाक्यावर घडली.

संग्रहीत छायाचित्र

पुणे – पुण्यात एका मद्यपी कारचालकाने भरधाव वेगात कार चालवत दोन दुचाकींना उडविल्याची घटना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास निगडी जकात नाक्यावर घडली.

या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींवर पिंपरीतल्या यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कारचालक मयुर घुमटकर हा दारुच्या नशेत कार चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

किरण दिलीप दहाने (२४), संकेत कमलाकर समेल (२३), शुभम संभाजी भालेकर (२३) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होते.

अविनाश बबन माने आणि शिनो जॉन विद्यायती हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कारचालक मयूर रमेश घुमटकर(२९) यांच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील आयआयटी एमआर या  महाविद्यालयात शिकत असलेले हे सर्व विद्यार्थी निगडी जकातनाक्याजवळ चहा पिण्यासाठी दुचाकीवरून आले होते. चहा पिऊन परतत असताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारने दोन्ही दुचाकींना मागून धडक दिली.

ही धडक इतकी भयंकर होती की यामध्ये एका दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तर दुसर्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकी बरेच अंतर फरफटत गेल्या. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी विद्यार्थ्यांना िपपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे-मुंबई रस्ता हा देहूरोड नजिक अतिशय अरुंद आहे. त्यामुळे इथे नेहमीच अपघात घडत असतात. इथे आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version