Home महाराष्ट्र पुण्यात साखर आयुक्तांची गाडी जाळली

पुण्यात साखर आयुक्तांची गाडी जाळली

0

पुण्याचे साखर आयुक्त विजय सिंघल यांची ऍम्बॅसिडर कार अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी पहाटे जाळल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे- साखर आयुक्त विजय सिंघल यांची गाडी अज्ञातांनी पेटवल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे साखर संकुल येथे घडला. राज्यात ऊसदर वाढीसाठी आंदोलन पेटले असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर साखर आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

साखर संकुलातील सरकारी निवासस्थानाच्या बाहेर विजय सिंघल यांनी गुरुवारी रात्री गाडी उभी केली होती. अज्ञात व्यक्तींनी पहाटे तीनच्या सुमारास गाडीला आग लावली. दरम्यान, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या मागे नेमके कोण आहे हे सांगणे कठीण आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे विजय सिंघल यांनी सांगितले.

ऊसाला तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे खासदार राजू शेट्टी यांचे इंदापूरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांच्या गाडीच्या जाळपोळीमागे ऊस आंदोलक शेतकरी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. एन. पाटील अधिक तपास करत आहेत.

[EPSB]

उसाचे आंदोलन तीव्र करणार

तर शेतकरी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलने, मोर्चे, रस्ता रोको करतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version