Home महामुंबई पालिका रुग्णालये घेणार मुंबईकरांच्या दातांची काळजी

पालिका रुग्णालये घेणार मुंबईकरांच्या दातांची काळजी

0

 तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न करणे, दातात अडकलेले अन्नकण टोकेरी वस्तूने काढण्याचा प्रयत्न करणे आदी विविध कारणांमुळे सध्या विविध विकारांचा त्रास होतो.
मुंबई – तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न करणे, दातात अडकलेले अन्नकण टोकेरी वस्तूने काढण्याचा प्रयत्न करणे आदी विविध कारणांमुळे सध्या विविध विकारांचा त्रास होतो. मात्र दातांचे आरोग्य जपण्यासाठी खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो. यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या राजावाडी, कूपर, भाभा, गोवंडी व कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात स्वतंत्र दंत विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका प्रशासनाच्या अखत्यारित येणारे २६ दवाखाने आणि पाच मोठय़ा रुग्णालयांत दंतचिकित्सा विभाग सुरू करण्यात येणार आहे. नूतन वर्षी फ्रेबुवारी महिन्यात पहिल्या टप्प्यातील केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या दातांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी तीन टप्प्यांत ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. २६ दवाखान्यांची अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अ श्रेणी, दुस-या टप्प्यात ब व तिस-या टप्प्यात क श्रेणीतील दंत चिकित्सक केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

फेब्रुवारीनंतर एप्रिलमध्ये दुस-या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे. दातदुखीने अनेक जण त्रस्त असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे दंत विभाग प्रत्येक रुग्णालयांत असणे गरजेचे बनले आहे. दातावरील उपचारासाठी सर्वसामान्य रुग्णांना खर्च परवडण्याजोगा होण्यासाठी पालिका रुग्णालयात स्वतंत्र दंत विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागासाठी आवश्यक साधनसाम्रगी पालिकेकडे आली आहे. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख पालिका रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version