Home ताज्या घडामोडी पालिका खरेदी करणार रुग्णांसाठी नव्या बेडशीट

पालिका खरेदी करणार रुग्णांसाठी नव्या बेडशीट

0

पालिका खरेदी करणार १ कोटींच्या चादरी

मुंबई – मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांच्या बेडवर वापरण्यासाठी तब्बल १,२७,५०० नग ‘कॉटन बेडशीट’ची खरेदी केली जाणार आहे. पालिका यासाठी कंत्राटदाराला १,८०,४६,३५० रुपये मोजणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

पालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांच्या बेडवर असलेल्या बहुतांशी रुग्णालयांत बेडशीट्स जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या बेडशीट्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेकडे या बेडशीट्चा पुरवठा करण्यासाठी पाच निविदाकारांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मे.अमरीत व्हेंचर या कंत्राटदाराला याचे कंत्राट देण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, पालिका रुग्णालयांत नव्या बेडशीट उपलब्ध केल्या जाणार असल्याने रुग्णांची मळकट चादरींपासून सुटका होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version