Home मध्यंतर उमंग पालकत्वाचं गणित!

पालकत्वाचं गणित!

0

पूर्वापार चालत आलेलं पालकत्वाचं गणित आता बदललं आहे. आता आईचं हे काम आणि बाबांचं ते काम असा भेदभाव उरलेला नाही आणि हेच आजकालच्या मुलांना कळणं जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही आता जेव्हा सहकुटुंब कुठे बाहेर जातो तेव्हा मी जेवण वाढत असते आणि माझा नवरा मुलांचे डेटॉल सॅनिटायझरने हात धुऊन देत असतो आणि एकमेकांच्या याच सहकार्याने आपण एक चांगलं कुटुंब बनवू शकतो.

मागच्या रविवारी मी जरा लवकर उठले. माझी कामं आटोपून नाश्त्याचे खाणं बनवून ठेवलं. सगळे अजूनही साखरझोपेत होते. घरचं, सकाळची कामं आवरून मी बाजारात रोजसाठी भाजी, इतर खाणं आणि फळं आणायला बाहेर पडले. बाजारातून परतल्यावर इतर कामं आवरायला घेऊ या विचाराने दरवाजा उगडून घरात शिरले. पाहते तर मुलं उठली होती. ती फ्रेश होऊन टेबलवर आपला नाश्ता करत होती. मुलांच्या बाबांनी त्यांच्यासाठी सँडविच आणि दूध गरम करून दिलं होतं.

आम्ही दोघंही नोकरी करत असल्याने शनिवार-रविवार मुलांना अधिकाधिक वेळ देतो. उरलेल्या वेळात मात्र आम्ही आपापल्या मित्र-मैत्रिणींना भेटतो. वा नातेवाईकांकडे ठरल्याप्रमाणे जातो. पण सुट्टीच्या दिवशी आमची मुलं सोबतच असतात. मला इथे इतकंच सांगायचं आहे की पालकत्व ही दोघांनीही एकत्रपणे पेलायची जबाबदारी असते आणि ती दोघांनी मिळून पार पाडायला हवी. मुलांसंबंधित आमची कामं आम्ही वाटून घेतली आहेत. मी सर्वासाठी स्वयंपाक करते आणि मुलांचे बाबा मुलांना जेवू घालतात. मी त्यांना ब-याचदा बाहेर नेते, तर बाब ब-याचदा घरात मुलांसोबत खेळतो.

मी मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाते तर तो मुलांच्या शाळेत पेरेंट्स मीटिंगला जातो. आमच्यात कुणाचे काम कुठले यावर कधीच वाद किंवा चर्चा झाली नाही, हे आमच्यासाठी अगदी सहज होतं. आमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर सतत मुलांच्या संदर्भात मेसेजेस येत असतात. आम्ही आमच्या कामातून वेळ काढून मुलांच्या खेळण्याचा, ने-आण करण्याचा वेळ ठरवून ठेवतो आणि मुलं आजारी पडल्यावर कुणी कशी रजा घ्यायची हेही आम्ही ठरवत असतो.

आमच्या आजूबाजूला आम्हाला मदत करणारी बरीच माणसं आहेत, पण तरीही कधी कधी आमच्या समोर अशा समस्या येतात की, यामध्ये आम्हाला आई-बाबा म्हणून मुलांसोबत राहणं आवश्यक असतं. मुलांच्या बाबांच्या ऑफिसमध्ये कामाची वेळ फ्लेक्जिबल असल्यामुळे ब-याच वेळा मुलांच्या आजारपणाच्या वेळी बरेच वेळा तेच रजा घेतात. आणि मी मात्र मनावर दगड ठेवून ऑफिसला जात असते. आता सध्याच्या धावपळीच्या आणि महागाईच्या दिवसात आई-वडिलांना दोघांना कमावणं गरजेचं असल्यामुळे गरजेप्रमाणे प्रत्येकाने आलटून-पालटून वेळ देणं आवश्यक झालं आहे.

त्यामुळेच वडिलांनी मुलांची तब्येत खराब आहे म्हणून रजा घेतल्यास कुणाची आता हरकत नसते. त्यामुळेच आई जवळ नसल्यास तिला गुन्हेगार ठरवत नाहीत. ब-याच कामाच्या जागी आता या समस्यांना डोळसपणे बघितलं जातं. माझ्या घरी जेव्हा मुलं आजारी पडतात त्याची कारणं असतात बाहेरचं खाणं, शाळेतून होणारे संसर्ग किंवा वातावरणातील बदल. आता हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी माझा नवरा स्वत: घरी राहून मुलांची काळजी घेतो. आणि खरं सांगू माझी दोन्ही मुलं आजारी असताना बाबांसोबत अधिक आनंदी असतात.

कारण ते त्यांची तशी काळजी घेतात. त्यांच्यासोबत खेळतात, त्यांना गोष्टी सांगतात आणि त्यांच्यासाठी पुस्तकंसुद्धा वाचतात. अगदी मुलांचे मित्र बनून. मुलांना शिस्त लावण्यातही ते माझ्यापेक्षा चांगले आहेत आणि मी हे प्रामाणिकपणे मान्यही करते. मुलं आजारी असताना त्यांना बाथरूमला नेल्यावर मी त्यांचे हात डेटॉल हँडवॉशने धुतल्यावरही त्यांना त्यांच्या बाबांसोबत हात धुवायला मज्जा येते. कारण ते त्यांना बाथरूममध्ये घेऊन जाऊन हळूच त्यांच्या हातवर लिक्विड टाकतात. त्यांना हात घासायला सांगतात आणि या साध्या साध्या गोष्टी ते खूप मजेदार बनवितात. जे कदाचित मी करत नाही.

घराची साफसफाई होत असताना त्यात डेटॉल अँटिसेप्टिकचा वापर नियमाने होतोय की नाही यातसुद्धा ते आवर्जून लक्ष घालतात. मुलांच्या आंघोळीच्या वेळीसुद्धा ते मुलांची तेवढीच काळजी घेतात. यामुळे मुलं त्यांच्यासोबत फार रुळली आहेत. पूर्वापार चालत आलेलं पालकत्वाचं गणित आता बदललं आहे. आता आईचं हे काम आणि बाबांचे ते काम असा भेदभाव उरलेला नाही. आणि हेच आजकालच्या मुलांना कळणं जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही आता जेव्हा सहकुटुंब कुठे बाहेर जातो तेव्हा मी जेवण वाढत असते आणि माझा नवरा मुलांचे डेटॉल सॅनिटायझरने हात धुऊन देत असतो आणि एकमेकांच्या याच सहकार्याने आपण एक चांगलं कुटुंब बनवू शकतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version