Home मध्यंतर सुखदा पारंपरिक खेळ

पारंपरिक खेळ

0

आमच्या त्या काळी, माणसांना टीव्हीचे वेड नव्हते, मोबाईलचे, आभासी खेळांचे वेड, विविध व्यसने नव्हती. त्या वेळी अतिशय छान, बुद्धीला चालना देणारे खेळ खेळले जात. खेळ जमा करणारे, खेळणारे खेळाडू असे खेळ नेहमी जमवतात.

या जुन्या खेळांची माहिती बोर्डवर लिहून, सोंगटय़ा बनवून, कलिनाला भरलेले प्रदर्शन मी नुकतेच पाहिले. ‘कहत कबीर सुनो भाई साधू’ म्हणत पूर्वीच्या बुद्धिमान लोकांचे खेळले गेलेले खेळ, इथे बघायला मिळाले. शोधून सापडणार नाही, असे खेळ होते.

सापशिडी, मोक्षपट्टम / पळंगुडी, ग्यान-चौपाल या खेळात पटावर ८४ घरे असतात. हा खेळ ज्ञान व नीती शिकवतो.

वाघ बकरी चौपाल – वाघ चाळ (नेपाळ) ३ ते ५ वाघाचे बिल्ले व १७, २१, २४ बकरीचे बिल्ले घेऊन हा खेळ खेळला जातो. बकरीला वाघ खातो विशेषत: जवळपासच्या बक-यांना! ही खेळपद्धती सोपी आहे, पण शिकावी लागते, मजा येते.
जीवनातील विविध प्रसंगांना तोंड द्यायला, हे खेळ शिकवतात. गणित शिकायला, व्यापार शिकायला मदत करतात. आजचे व्हीडिओ गेम हे या मूळ पुरातन खेळांचेच सुधारित रूप आहे.

मिकाडू काचपाणी – दोन रंगी बांगडीच्या काचांवर, मजेत खेळले जाते. व्यापार, हे आधुनिक रूप या खेळातील रंजक रूप आहे. अली गुली माने (कन्नड), पलंगुडी (तामिळ)मध्ये, चिंचेच्या बियांनी म्हणजे चिंचोक्यांनी, सागरगोटय़ांनी हा खेळ खेळला जातो. ७/७ घरे अशी एकूण १४ घरे असतात. सातव्या घरात बी रुजवणे हे तत्त्व असते.

नवकंकरी (महाराष्ट्र) – ३३=९ घरे असलेला हा खेळ दोन व्यक्ती खेळतात. गुजरातमध्ये नवकंकरी म्हणतात.

अष्टपद – ८४ अशी ३२ घरे असलेल्या, चौकटीवर हा खेळ खेळतात. मध्ये किल्ला व खेळघर, आराम असतो. फुलीच्या आकाराचा हा सारिपाट असतो. विणलेला देखील असतो.

पचीसी – ५५ अशी २५ घरे असलेल्या या खेळाला चौपाल/सारिपाट/पचीसी असे म्हटले जाते. ल्युडोसारखा, दोन ते चार व्यक्ती खेळतील, असा हा खेळ आहे. अकबर राजाच्या फतेपूर सिक्रीच्या कोर्टात, हा खेळ खेळला जात असे, असे गाईड सांगतो. महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे. हे सर्व खेळ करमणुकीसाठी आहेत. कुठल्याही खेळात पैसे लावून खेळू नये, खेळाचे व्यसन लावून घेऊ नये. खेळात मन रमवावे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version