Home महामुंबई पाणी बिल थकबाकीच्या यादीत सचिन तेंडुलकर

पाणी बिल थकबाकीच्या यादीत सचिन तेंडुलकर

0

महापालिकेच्या जाहीरातीतून ‘पाणी वाचवा’ असा संदेश देणा-या सचिन तेंडुलकरच्याच नावावर थकीत पाणीबिल असल्याचे आढळले आहे.

मुंबई– महापालिकेच्या जाहीरातीतून ‘पाणी वाचवा’ असा संदेश देणा-या सचिन तेंडुलकरच्याच नावावर थकीत पाणीबिल असल्याचे आढळले आहे. तसेच महापालिकेच्या थकीत पाणीबिल देयकांच्या यादीत अनेक दिग्गज व्यक्तींच्या नावाचाही समावेश आहे.

मुंबई महानगर पालिकेने थकीत पाणीबिल देयकांच्या जाहीर केलेल्या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सोबतच, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचाही समावेश आहे.

सचिन तेंडुलकरचे पेरी क्रॉस रोडवरील निवासस्थान, बाळासाहेब ठाकरेंचा ‘मातोश्री’ बंगला, अब्दुल रेहमान अंतुले यांचे कुटुंबिय व अबू आझमी यांच्या कुलाबा येथील हॉटेलचा यात समावेश आहे.

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी सहा डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर थकीत पाणीबिल देयकांची यादी जाहीर करावी असे आदेश दिले होते. जाहीर केलेल्या यादीमध्ये ९१९२ पानांची थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली.  या सर्वांकडून महापालिकेला सुमारे एक हजार कोटीचा दंड महापालिकेला वसूल करायचा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version