Home टॉप स्टोरी पाकिस्तानकडूनच दाऊदला सुरक्षा

पाकिस्तानकडूनच दाऊदला सुरक्षा

0

अंडवरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच वास्तव्यास असून, त्याला पाकिस्तानकडून सुरक्षा देण्यात आल्याचा दावा छोटा राजन याने केला आहे.

बाली- मार्च १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार व अंडवरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच वास्तव्यास असून, त्याला पाकिस्तानकडून सुरक्षा देण्यात आली असल्याचा दावा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याने केला आहे. राजन सध्या इंडोनेशियन पोलिसांच्या ताब्यात आहे.

काही पत्रकारांनी राजनची भेट घेतली असता, त्याने दाऊद पाकिस्तानातच असल्याचा गौप्यस्फोट केला. भारताने दाऊदच्या पाकिस्तानमधील वास्तव्याचे आणि तेथील ११ निवासस्थानांमधील वास्तव्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही, दाऊद आमच्या देशात नाहीच, असा कांगावा पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस येऊन आपले बिंग फुटण्याची दाट शक्यता असल्याने पाकिस्तानने दाऊदच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

राजनच्या अटकेनंतर दाऊद इब्राहीम आणि हाफीज सईदच्या सुरक्षेतही पाकिस्तानने वाढ केली आहे. कराची आणि इस्लामाबादमधील दाऊदच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. विदेशी गुप्तचर संस्थांकडून ही माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

छोटा राजनला लवकरच भारतात आणले जाणार आहे. दाऊदच्या निकटवर्तीयांना मारल्याचे आरोप छोटा राजनवर आहेत. तसेच, राजन याने आपण गेली २२ वर्षे दहशतवादाविरोधात लढलो आणि यापुढेही लढणार असल्याचे सांगितले. यामुळे पाकिस्तानने दाऊद इब्राहीमची सुरक्षा वाढवली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, दाऊद इब्राहिम हा पाकिस्‍तानात आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र, भारताने वारंवार दाऊदच्या पाकिस्तानमधील वास्तव्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानने नन्नाचा पाढा सुरुच ठेवला आहे. त्‍यामुळे आपले बिंग फुटू नये म्हणून पाकिस्‍तानवर दबाव वाढला आहे. परिणामी, दाऊदला पाकिस्‍तानबाहेर जाणे मुश्किल झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version