Home मध्यंतर उमंग पर्यटकांना दाखवला जातो झेब्रारूपी गाढव

पर्यटकांना दाखवला जातो झेब्रारूपी गाढव

0

चक्क गाढवाच्या अंगावर काळ्या पट्टय़ा रेखाटून ते गाढव झेब्रा म्हणून प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आल्याचा एक हास्यास्पद प्रकार नुकताच इजिप्तमधील प्राणिसंग्रहालयात घडला आहे. या संग्रहालयात येणा-या पर्यटकांना गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे मूर्ख बनवले जात होते. पण, या प्रकाराची पोलखोल हे प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांने केली आहे.

हा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करून संग्रहालयाची लबाडी उघडकीस आणली आहे. हे फोटो त्यानंतर अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्राणिसंग्रहालयात झेब्रा नसल्याने गाढवाच्या अंगावर रंगाच्या साह्याने पट्टे ओढण्यात आले. हा प्रकार कैरो इंटरनॅशनल म्युझियम पार्कमध्ये घडला असून गाझामधील एका प्राणिसंग्रहालयातही काही वर्षापूर्वी असाच प्रकार घडला होता. तिथेही दोन गाढवांच्या अंगावर पट्टे रेखाटण्यात आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version