Home Uncategorized परदेशवारीची तयारी करताय, तुम्ही स्वत:चा विमा उतरवला आहे का?

परदेशवारीची तयारी करताय, तुम्ही स्वत:चा विमा उतरवला आहे का?

0

तुम्ही तुमच्या आवडत्या प्रवासासंबंधीच्या संकेतस्थळावर आहात, तुमच्या विमान प्रवासाची तिकिटे काढत आहात आणि खूप दिवसांपासूनवाट पाहत असलेल्या ग्रीसमधील सुट्टीची तयारी करत आहात.

तुम्ही तुमच्या आवडत्या प्रवासासंबंधीच्या संकेतस्थळावर आहात, तुमच्या विमान प्रवासाची तिकिटे काढत आहात आणि खूप दिवसांपासूनवाट पाहत असलेल्या ग्रीसमधील सुट्टीची तयारी करत आहात.

तुम्हाला प्रवासी विमा उतरवायचा आहे का, असा प्रश्न विचारणारी एक खिडकी संगणकाच्या पडद्यावर दिसते.  कारण तुमचा स्थानिक मेडिक्लेम विमा तुमचे भारताबाहेर रक्षण करत नाही, तिथे हा विमा काम करतो.

खरेतर काही देशांनी पर्यटकांनी प्रवासी विमा उतरवणे अनिवार्य केले आहे. उदाहरणार्थ, शेंजेन देशामध्ये प्रवासी विमा हा पर्यटक व्हिसाचा एक अनिवार्य भाग आहे.

ऑस्ट्रेलियामध्येही एका विशिष्ट वयावरील प्रवासी व्यक्तींना प्रवासी विमा घेणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, परदेशी शिकायला जाणा-या विद्यार्थ्यांना प्रवासी विमा घेण्याचा सल्ला दिला जातो.

अचानक येणारे आजारपण, अपघाती वैद्यकीय मदतीचा खर्च, अपघाती मृत्यू, आणि वैद्यकीय कारणांमुळे केली जाणारी परत पाठवणी.

प्रवासात आपले सामान हरवणे आणि सामान उशिरा येणे या विमान प्रवासात नेहमी येणा-या अडचणी आहेत, ज्याची काळजी प्रवासी विमा घेतो. पण हे विमा संरक्षण हे आपले सामान विमान कंपनीच्या ताब्यात असेपर्यंतच उपलब्ध असते.

तसेच विमानात चेक इन केलेले सामान आणि भारताच्या हद्दीबाहेर सामान मिळण्यास झालेला विलंब याच गोष्टीवर संरक्षण उपलब्ध आहे. म्हणजेच भारतात जर सामान मिळण्यास उशीर झाला तर हे विमा लागू होणार नाही.

प्रवासी विम्यातील काही तरतुदी यात्रा विलंब, यात्रा रद्द होणे, पुढे जोडून असलेले विमान चुकणे, आणि पासपोर्ट (जो विमा कागदपत्रांचा एक भाग आहे) हरवणे यामुळे होणा-या असुविधेची काळजी घेतात. परदेशात कायदेशीर खटल्यांच्या वैयक्तिक जबाबदारीलाही यात संरक्षण मिळते.  विमाधारकाच्या घरीत तो परदेशी असताना चोरी झाल्यास चोरीसंबंधीच्या फायद्यानुसार संरक्षण पुरवते.

प्रवासी विम्यासंबंधी वस्तुस्थिती

जर आपण ६ महिने ते ७० वष्रे या वयाचे असाल तर आपण प्रवासी विमा खरेदी करण्यास पात्र आहात. ७१ वष्रे आणि पुढील वयाचे लोक विमा घेऊ शकतात, पण त्याचे संरक्षण मर्यादित असते. प्रवासी विमा प्रत्येक प्रवासासाठी जास्तीत जास्त १८० दिवसांचा असतो. विमा हप्ता ५०,००० ते ५,००,००० डॉलपर्यंत असू शकतो आणि वैद्यकीय खर्च, विमा संरक्षणाचे मूल्य यावर तो ठरतो.

पूर्वीपासून असलेले आजारांना यातून वगळले जाते आणि विम्याची मोजणी वय आणि सहल यावर अवलंबून असते. तसेच बाह्यउपचार (ओ.पी.डी.) आणि अंतरूपचार (इन पेशंट) उपचार हे प्रवासी विम्यात येतात. विमाधारक व्यक्ती भारतात येऊन बाह्यउपचारावर झालेल्या खर्चाचा परतावा मागू शकतो. परदेशी शिक्षण संस्थाच्या निर्देशानुसार विद्यार्थी विशेष विमा घेऊ शकतात आणि त्याची मुदत एक वर्ष असते.

विद्यार्थी विम्यामध्ये मानसिक आजार, अंमली पदार्थ व दारूच्या व्यसनातून पुनर्वसन, पुरस्कर्ता संरक्षण, अभ्यासात पडणारा खंड आणि सद्भाव भेट याचाही समावेश असतो. प्रवासी विमा घेतेवेळी त्यातील मिळणारे संरक्षण काळजीपूर्वक तपासले पाहिजे आणि त्यातून काय वगळले आहे हे पहिले पाहिजे. उपलब्ध विम्याची तुलना करताना विम्याचे विकल्प, हप्ता, वैद्यकीय संरक्षण, वयाची मर्यादा या बाबींचा विचार केला पाहिजे.

प्रवासी विमा घेताना नेहमी विश्वसनीय विमा संस्थेकडूनच घ्यावा. या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव असला पाहिजे आणि कामाचा उत्तम अनुभव असला पाहिजे. विमा संस्थेचा दावे निकाली काढण्याचा अनुभवसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. सर्व प्रवाशांनी प्रवासी विमा घ्यावा आणि अनपेक्षितपणे निर्माण होणा-या अडचणीच्या प्रसंगात मदत मिळण्याची तजवीज करावी.
– एम. रविचंद्रन,  अध्यक्ष (विमा), टाटा एआयए जनरल इन्शुरन्स

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version