Home व्यक्तिविशेष पं. विष्णू दिगंबर पलुस्कर

पं. विष्णू दिगंबर पलुस्कर

0

संगीत कलेला वैभवाचे दिवस लाभावेत म्हणून आपले सारे आयुष्य पणाला लावणा-या गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचा आज स्मृतिदिन. दि. १२ ऑगस्ट १८७२ रोजी कुरूं दवाड एका कीर्तनकाराच्या घरात विष्णू दिगंबर गाडगीळांचा जन्म झाला. पुढे बराच काळ ‘पलुस’ गावी त्यांचे वास्तव्य झाल्याने ते विष्णू दिगंबर पलुस्कर म्हणूनच प्रसिद्धीस आले. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकडे ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतलेल्या पलुस्करांच्या गायकीत आलाप, बोल उपज व वजनदार ताना या तिन्ही अंगांचा समतोल समन्वय होता. संगीत कलेला आणि कलाकारांना समाजात मानाचे स्थान मिळावे, याबरोबरच सामान्यजनांना कमी खर्चात संगीत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी संगीत विद्यालयांची स्थापना केली. लाहोर येथे ५ मे १९०८ मध्ये मुंबई येथे ‘गांधर्व संगीत महाविद्यालये’ स्थापन करणा-या पंडित पलुस्करांनी संगीत विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम आखून वेगवेगळय़ा परीक्षा – पदव्यांचे नियोजन केले. मुंबईत खास स्त्री वर्गासाठी संगीत शिक्षणाची व्यवस्था केली. १९१२ पासून तुलसीदासांच्या रामायणावर प्रवचने देणारे हे. पं. पलुस्कर. यांनीच ‘रघुपतीराव राजाराम’ हे भजन लोकप्रिय केले. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत प्रत्येक सभेत म्हणण्याची आता प्रथा त्यांनीच सुरू केली. संगीतकला साधनेवर सुमारे साठ ग्रंथ लिहिणा-या या गायनचार्य व संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचे दि. २१ ऑगस्ट १९३१ रोजी निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version