Home महामुंबई ‘नैसर्गिक स्रेतांची धूळदाण’ ठरले मानकरी

‘नैसर्गिक स्रेतांची धूळदाण’ ठरले मानकरी

0

शालेय विद्यार्थ्यांत विज्ञानविषयक दृष्टिकोन आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध शाळांत विज्ञान प्रदर्शने भरवण्यात येत आहेत. 

मुंबई – शालेय विद्यार्थ्यांत विज्ञानविषयक दृष्टिकोन आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध शाळांत विज्ञान प्रदर्शने भरवण्यात येत आहेत. मुंबईत शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या अंतर्गत आणि बृहन्मुंबई के. पी. पूर्व विभागाच्या वतीने अंधेरी पूर्व येथील सेंट डॉमनिक सॅव्हिओ हायस्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात जोगेश्वरी-मेघवाडीतील श्रमिक विद्यालयाने प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची दोन पारितोषिके पटकावली. या शाळेच्या सर्व प्रयोगांची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून श्रमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘साधूया उपाय छान, थांबवू या नैसर्गिक स्रेतांची धूळदाण’ या प्रयोगाला विज्ञान प्रदर्शनात प्रथम व सर्वोत्कृष्ट अशी दोन पारितोषिके मिळाली आहेत. तर याच महाविद्यालयातील दुस-या एका गटाने सादर केलेल्या ‘शाळेचे विज्ञान मंडळ व निसर्ग मंडळ’, ‘प्रयोगशाळा साहायक’ या प्रयोगाची प्रथम व द्वितीय पारितोषिकासाठी निवड झाली आहे. ‘लोकसंख्या शिक्षण’ या विषयावरील प्रयोगाची निवडही द्वितीय क्रमांकासाठी करण्यात आली आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘विज्ञान नाटिका’ या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पध्रेत कु. निधी गवस या विद्यार्थिनीने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. गवस हिची जिल्हास्तराकरता निवड करण्यात आली आहे.

या विज्ञान प्रदर्शना लहान गटातून घेण्यात आलेल्या प्रदर्शात ‘साधुनी समतोल पाण्याचा, फुलवू मळा पिकांचा’ या प्रकल्पाची द्वितीय, तर निबंध स्पर्धेत कु. मनाली विजय हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. चव्हाण, विज्ञान प्रदर्शनप्रमुख शंकर खरवडे आणि शाळेच्या संचालिका स्मिता चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version