Home महामुंबई नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा हंगाम लांबणीवर

नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा हंगाम लांबणीवर

0

पावसाळ्यानंतर सुरू होणारा नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे.
नेरळ  – पावसाळय़ानंतर सुरू होणारा नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे. अमन लॉज ते माथेरान शटल सेवेसाठी अमन लॉज स्थानकात बनवण्यात आलेल्या शटलच्या क्रॉसिंग लाइनला मुख्य सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील न दाखवल्यामुळे हा विलंब होत आहे. मिनी ट्रेनच्या पर्यटन हंगामासाठी नेरळ डिझेल लोकोमध्ये सहा डिझेल इंजिन सज्ज आहेत. हंगामास विलंब होत असल्यामुळे पर्यटक आणि माथेरानवासियांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मिनी ट्रेनचा पर्यटन हंगाम १९ ऑक्टोबरला सुरू होणार म्हणून तेथील व्यापाऱ्यांनी पर्यटकांच्या स्वागताची तयारी सुरू केली होती. माथेरानमधील पर्यटनव्यवसाय मुख्यत्वे मिनी ट्रेनवर अवलंबून असतो. झुक-झुक अगीन गाडीतून बच्चेकंपनीला प्रवास करता यावा म्हणून अनेक पर्यटकांनी आधीच बुकिंग केले आहे. ऐन नवरात्रीत मिनी ट्रेन सुरू होणार म्हणून दस-याला जोडून येणा-या सुट्टय़ा माथेरानमध्येच घालवण्याचे बेत रचणा-यांची संख्याही मोठी आहे. रेल्वे प्रशासनानेही महिनाभर आधीपासूनच विविध कामांवर शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र मिनी ट्रेन अद्याप सुरू झालेली नाही.

रेल्वे बोर्डाचे मुख्य सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी अमन लॉज स्थानकात नवीन क्रॉसिंग उभारण्याची सूचना २६ सप्टेंबरला केली होती. नवीन क्रॉसिंग लाइनवर मिनी ट्रेन वळवण्यास बक्षी यांनी हिरवा कंदील दाखवला की सेवा सुरू होणार आहे. मिनी ट्रेनच्या शनिवार-रविवारी सहा आणि अन्य दिवशी चार फेऱ्या होणार आहेत. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचा अहवाल १५ ऑक्टोबरला मुंबईतील कार्यालयात पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन हंगाम वेळेवर सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, शटलसेवेला उदंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे मिनी ट्रेन सुरू करण्यात टाळाटाळ होत असल्याची शक्यता येथील व्यापारी आणि पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. गतवर्षी परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे ही सेवा १६ ऑक्टोबर ऐवजी २१ ऑक्टोबरला सुरू करण्यात आली होती. मात्र, यंदा माथेरानमध्ये परतीचा पाउसही नाही. त्यामुळे येथील व्यवसायांना झळाळी देणारी मिनी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी माथेरानकर करत आहेत.

[EPSB]

नेरळ-माथेरान मिनीट्रेन नव्या हंगामासाठी सज्ज

पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन १९ ऑक्टोबरपासून पुन्हा नॅरोगेजवर चालवण्यात येणार आहे

 

 

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version