Home महामुंबई ठाणे नेरळ डिझेल डिझेल लोको कर्मचा-यांचे आंदोलन

नेरळ डिझेल डिझेल लोको कर्मचा-यांचे आंदोलन

0

नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गासाठी महत्वाची भूमिका बजावणा-या नेरल लोकोमधील रेल्वे कर्मचा-यांनी मंगळवारी सकाळी विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले. 
नेरळ – नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गासाठी महत्वाची भूमिका बजावणा-या नेरल लोकोमधील रेल्वे कर्मचा-यांनी मंगळवारी सकाळी विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले. परिणामी नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा खंडित झाली असून सकाळची पहिली गाडी सुमारे अडीच तास उशिराने रवाना झाली.

एनआरएमयू संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात ब्रेक पोर्टर स्टाफ, मिनीट्रेनचे डब्बे स्टेशनवर आणणारे कर्मचारी तसेच फिटर स्टाफ असे ८० कर्मचारी यात सहभागी झाले होते. त्यामुळे नेरळ येथून सकाळी ६.४० वाजता माथेरानला जाणारी मिनीट्रेन वेळेवर निघाली नाही. यानंतर ब्रेक पोर्टरांच्या मुलांना रेल्वे गँगमन म्हणून रेल्वेत सामावून घेण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेत तसे पत्र पाठवले. यानंतर हे आंदोलन मागे घेत ९.१५ वाजता पहिली मिनीट्रेन निघाली.

या आंदोलनात एनआरएमयुचे विभागीय सचिव नंदलाल सेवा, जॉन ओमेना यांच्यासह कर्जत-नेरळ युनिटचे अध्यक्ष शंकर पगारे, सचिव राजेंद्र साळुंखे तसेच अन्य पदाधिकारी व कामगार सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पर्यटकांचे मात्र मोठे हाल झाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version