Home महामुंबई नेरळ एसटी थकली

नेरळ एसटी थकली

0

कर्जत आगारातील नेरळ एसटी स्थानकातून ७ एसटी गाडया दिवसाला ४९ फे-या मारतात, मात्र मागील १५ दिवसांत या फे-या रद्द होण्याचे प्रकार वाढले आहेत.

नेरळ – कर्जत आगारातील नेरळ एसटी स्थानकातून ७ एसटी गाडया दिवसाला ४९ फे-या मारतात, मात्र मागील १५ दिवसांत या फे-या रद्द होण्याचे प्रकार वाढले आहेत. यातील ८-१० फे-या ब्रेक डाउन गाडयांमुळे रद्द होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. दरम्यान, नेरळ स्थानकाच्या दुरवस्थेकडे कर्जत आगाराचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.नेरळ एसटी स्थानकातून मिरचुलवाडी, बोरगाव, करोळे, शिंगढोळ, सुगवे, गुडवण, पोशीर, कळंब, ओलमण, देवपाडा, वारे, साळोख आदी ठिकाणी एसटी गाडया सोडण्यात येतात.

या सर्व ठिकाणच्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी नेरळ एसटी स्थानकातून ७ एसटी गाडया ४९ फे-या मारतात. मात्र मागील १० वर्षाच्या तुलनेत आज एसटीच्या अनेक फेऱ्या बंद झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची समस्या, तर काही ठिकाणी प्रवाशी मिळत नसल्याची आगाराकडून तक्रार करण्यात येत आहे. याही परिस्थितीत पूर्वी ९८ फे-या होणा-या नेरळ एसटी स्थानकातून आज केवळ ४९ फे-या होत आहेत.

मात्र या सगळयाला एसटी प्रशासन जबाबदार आहे. कारण कर्जत एसटी आगारातून सातत्याने नादुरुस्त गाडय़ा नेरळ स्थानकात पाठवल्या जातात. या गाडय़ा अर्ध्या रस्त्यातच बंद पडत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. बंद पडणा-या एसटी गाडयांमुळे प्रवासी खासगी गाडयांना प्राधान्य देतात. एसटी प्रशासनाची उदासीनता व नादुरुस्त गाडयांमुळे कळंब, पोशीर, मिरचूलवाडी, गुडवण, ओलमण या मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या फे-या किमान ७-८च्या संख्येने दररोज रद्द होत आहेत.

नेरळ-कशेळे रस्त्यावर एकमेव मिरचूलवाडी गाडी धावते, तीदेखील आठवडय़ात एकदाही धावली नाही. त्यामुळे हा मार्ग तसा एसटीसाठी बंद आहे. दुसरीकडे नेरळ-कळंब मिनी बसदेखील आठवडाभरात धावली नाही. तर पोशीर गाडयांच्या फे-या लक्षणीय प्रमाणात कमी झाल्या असून वारे, ओलमण एसटीबाबतही तीच परिस्थिती आहे.

नेरळ एसटी स्थानकातून ७ एसटी गाडया ४९ फे-या मारतात. मात्र मागील १० वर्षाच्या तुलनेत आज एसटीच्या अनेक फे-या बंद झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची समस्या, तर काही ठिकाणी प्रवाशी मिळत नसल्याची आगाराकडून तक्रार करण्यात येत आहे. याही परिस्थितीत पूर्वी ९८ फे-या होणा-या नेरळ एसटी स्थानकातून आज केवळ ४९ फे-या होत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version