Home महामुंबई ठाणे नेरळमध्ये निवडणुकीचे वारे

नेरळमध्ये निवडणुकीचे वारे

0
संग्रहित छायाचित्र

ममदापूर गट ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरकारतर्फे सामाजिक आरक्षणाची सोडत ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पुंडलिक शिनारे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली.

संग्रहित छायाचित्र

नेरळ – ममदापूर गट ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरकारतर्फे सामाजिक आरक्षणाची सोडत ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पुंडलिक शिनारे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली. प्राधिकृत आरक्षण रचना अधिकारी दिनेश मोडक आणि नेरळ सजाचे तलाठी मनोहर गोरेगावकर यांनी कामकाज पाहिले.

एकूण ३ प्रभागांमध्ये ९ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग क्र. १ मध्ये अनुसूचित जमाती स्त्री -१ , नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष – १ , सर्वसाधारण पुरुष -१, प्रभाग क्र. २ मध्ये अनुसूचित जाती स्त्री- १ , सर्वसाधारण पुरुष -१, सर्वसाधारण स्त्री -१ , प्रभाग क्र. ३ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री -१ , सर्वसाधारण पुरुष १, सर्वसाधारण स्त्री -१ अशा ९ जागांचे समांतर आरक्षण करण्यात आले. ममदापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या स्त्रियांसाठी राखीव ठेवले आहे.

जाहीर आरक्षणामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाला २० वर्षात प्रथमच संधी मिळाली आहे. १९९४ मध्ये नेरळ-ममदापूर गट ग्रुप ग्रामपंचायतीतून ममदापूर ग्रामपंचायत वेगळी झाली. त्यावेळीही आरक्षणाचा लाभ ममदापूर ग्रामपंचायतीला मिळाला नव्हता.

मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग आणि रायगडच्या जिल्हाधिका-यांकडे सातत्याने पाठपुरावा करून अनुसूचित जातीची लोकसंख्या पाहून या वर्गाला आरक्षण मिळाले. याबद्दल मामदापूरचे सामाजिक कार्यकत्रे सचिन अभंगे यांनी आभार मानले.

प्राधिकृत आरक्षण रचना अधिकारी दिनेश मोडक व सहाय्यक मनोहर गोरेगावकर यांनी या आरक्षणाविषयी नागरिकांच्या काही हरकती असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ८ ऑक्टोबपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version