Home महामुंबई ठाणे निवडणूक काळातील गुन्हेगारीवर पोलिसांचे लक्ष

निवडणूक काळातील गुन्हेगारीवर पोलिसांचे लक्ष

0

मुंबई-ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये अलिकडच्या काळात रवी पुजारी टोळीकडून राजकारणी, बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकीचे फोन येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याण – मुंबई-ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये अलिकडच्या काळात रवी पुजारी टोळीकडून राजकारणी, बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकीचे फोन येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत पोलिसांचे काम वाढले असून अनेक उमेदवारांवर विविध प्रकरणात खटले दाखल आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनीही तयारी सुरू केली आहे.

महापालिकेच्या १२२ प्रभागांपैकी ११९ प्रभागांसाठी निवडणूक येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. मात्र, या निवडणुकीत जवळपास दीडशे उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची किंवा त्यांच्यावर दखल,?अदखपात्र गुन्हे दाखल असल्याचे निवडणूक आयोगाला या उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

यंदाच्या निवडणुकीत जवळपास २७५ अपक्ष उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेली बंडखोरी वाद, हेवेदावे व विरोधाला तसेच स्पर्धेलाही पूरक ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलीस विभागांच्या एसआयएडीने, राज्य गुप्तवार्ता विभागाने अशा उमेदवारांची माहिती गोळा करून त्यांच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

तसेच मुंबईबाहेरून तसेच मुंबईतून कल्याण-डोंबिवलीत दाखल होणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version