Home देश निवडणूक आयोग करणार मतदानाचे आवाहन

निवडणूक आयोग करणार मतदानाचे आवाहन

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सात फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत अधिकाधिक दिल्लीकरांना सहभागी करुन घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबवली जाणार जाणार आहे.

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सात फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत अधिकाधिक दिल्लीकरांना सहभागी करुन घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबवली जाणार जाणार आहे. दिल्लीतील मेट्रो स्थानके आणि दिल्ली परिवहन संस्थेच्या बसेसमधून ही मोहीम राबवली जाणार आहे.

शनिवारपासून दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयाकडून संपूर्ण दिल्लीतील डीएमआरसी स्थानके, रेल्वे तसेच डीटीसीच्या बसेसमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

मेट्रो आणि डीटीसी बसेसमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यावेळी नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले जाणार आहे. तसेच मेट्रोमध्ये बसवण्यात आलेल्या एलसीडी टीव्हीवरही मतदान जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण कुमार यांनी सांगितले.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीत ६४ टक्के मतदान झाले होते. तर २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत ६६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. येत्या सात फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे तर १० फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version