Home देश महाराष्ट्रातून आतापर्यंत १४.५ कोटींची रोकड जप्त

महाराष्ट्रातून आतापर्यंत १४.५ कोटींची रोकड जप्त

0

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून केल्या जाणा-या कारवाईत आतापर्यंत राज्यातून तब्बल १४.५ कोटी रुपयांची रोख रक्कम तर ७५ लाखाहून अधिक रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यात काळ्यापैशाचा महापूर आला आहे. राज्यातील अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर रोकड तसेच दारु जप्त केली जात आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून केल्या जाणा-या कारवाईत आतापर्यंत राज्यातून तब्बल १४.५ कोटी रुपयांची रोख रक्कम तर ७५ लाखाहून अधिक रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या कारवाईत आतापर्यंत राज्यातून १४ कोटी ५२ लाख, ३७ हजार ८७६ रुपयांची रोकड तर ७५.९९ लाख रुपये किंमतीची २.८ लाख लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. उमेदवारांकडून ४.८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे,.

निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी निवडणूक आयोगाकडून भरारी पथक नेमण्यात आले आहे. केंद्रीय महसूल विभागातील आयकर, केंद्रीय उत्पादन विभाग आणि सीमाशुल्क विभागातील अधिका-यांची या पथकात नेमणूक करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version