Home टॉप स्टोरी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना नोटीस

निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना नोटीस

0

काँग्रेस पक्षाच्या ‘पंजा’ या चिन्हावर केलेल्या शेरेबाजी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाच्या ‘पंजा’ या चिन्हावर केलेल्या शेरेबाजी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवली आहे.

छत्तीसगड येथे सात नोव्हेंबर रोजी झालेल्या एका जाहीर सभेत मोदी यांनी ‘खूनी पंजा’ व ‘जालीम हाथ’ असा शब्दप्रयोग करत जहाल, बदनामीकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी काँग्रेसने आयोगाकडे तक्रार दाखल करत मोदींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मोदींनी वापललेला शब्दप्रयोग अत्यंत खेदजनक असून काँग्रेसविरोधात जनतेमध्ये दहशत माजवण्याचा प्रकार असल्याचे काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

आदर्श आचारसंहितेचे भंग केल्याप्रकरणी का कारवाई करण्यात येऊ नये याचे स्पष्टकरण निवडणूक आयोगाने मोदींकडून मागीतले आहे. यासाठी मोदींना १६ नोव्हेंबरपर्यतची मुदत देण्यात आली आहे.

मोदींनी जर दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास त्यांना या संदर्भात काहीही सांगायचे नाही असे समजले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आयोगाने म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version