Home महामुंबई ठाणे नालसोपारा अनाथाश्रमातील मुलाचे अपहरण

नालसोपारा अनाथाश्रमातील मुलाचे अपहरण

0

नालासोपारा मोरेगाव येथील नारायणचंद ट्रस्ट अनाथ अश्रमातील आठ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
पालघर – नालासोपारा मोरेगाव येथील नारायणचंद ट्रस्ट अनाथ अश्रमातील आठ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हर्षल गणेश कांबळे असे त्याचे नाव आह़े तो दोन वर्षापासून या आनाथाश्रमात शिक्षण घेत होता़

नालासोपारा पूर्व मोरेगाव येथे नारायण चंद ट्रस्ट संचालित अनाथ मुलांचे व नौकरी करणा-या निराधार, अनाथ, व रस्त्यावरील मुला मुलींचे वसतिगृह आह़े  हर्षल हा २५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास अश्रमातून अचानक बेपत्ता झाला.  ट्रस्टच्या संचालकाच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एका भीक मागणा-या मुलाचे अपहरण का झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हर्षल गणेश कांबळे हा मूळचा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आह़े  तो लहान असतानाच वडिलांनी त्याच्या आईचा खून केला होता़ वडिलांनीच त्याला भीक मागण्यासाठी मुंबईत आणून सोडले होत़े  भिवंडीतील बाल सुधारगृहातून हर्षलला दोन वर्षापूर्वी नालासोप-यातील अनाथाश्रमात हलवण्यात आले होते. तो विरारच्या उत्कर्ष विद्यालयात तिसरीत शिकत होता. ट्रस्ट्चे संचालक विजय सराटे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात हर्षलच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आह़े

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version