Home देश नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीस आयोगाचा हिरवा कंदील

नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीस आयोगाचा हिरवा कंदील

0

संरक्षण मंत्रालयाला नव्या लष्कर प्रमुखांची नियुक्ती करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी हिरवा कंदील दिला आहे.
नवी दिल्ली-  नव्या लष्कर प्रमुखांची नियुक्ती करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी हिरवा कंदील दिला आहे. भाजपने निवडणुकीच्या दरम्यान या नियुक्तीस विरोध केला होता.

विद्यमान लष्कर प्रमुख बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. परंपरेनुसार लष्कर प्रमुखांच्या निवृत्तीच्या दोन महिने आधी नव्या लष्कर प्रमुखांची घोषणा केली जाते.

यासंदर्भात भाजपने २७ मार्चला हा मुद्दा उपस्थीत केला होता. नव्या लष्कर प्रमुखांची नियुक्ती संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतरच घेतला जावा अशी मागणी भाजपने केली होती.

विशेष म्हणजे  संरक्षण मंत्रालयाला याआधी लष्कर प्रमुख बिक्रम सिंग यांच्या नियुक्तीची घोषणा लष्कर प्रमुख व्ही.के.सिंग यांच्या निवृत्तीच्या तीन महिने आधी करण्यात आली होती.

दरम्यान, बिक्रम सिंग यांच्या निवृत्तीनंतर सेवा ज्येष्ठतेनुसार व्हाईस चीफ ले.जनरल लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग हे नवे लष्कर प्रमुख होण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version