Home क्रीडा धवन, चांदकडे भारत ‘अ’ चे नेतृत्व

धवन, चांदकडे भारत ‘अ’ चे नेतृत्व

0

बांगलादेश ‘अ’ संघाविरुध्द होणा-या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत सलामीवीर शिखर धवन आणि उनमुक्त चांद भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे.

नवी दिल्ली – भारत दौ-यावर येणा-या बांगलादेश ‘अ’ संघाविरुध्द होणा-या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत सलामीवीर शिखर धवन आणि उनमुक्त चांद भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे.

एकदिवसीय मालिकेत उनमुक्त चांदकडे भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व असणार आहे. १६,१८ आणि २० सप्टेंबरला बंगळूरुमध्ये तीन एकदिवसीय सामने होतील.

२७ ते २९ सप्टेंबर दरम्यान बंगळूरुमध्ये होणा-या तीन दिवसीय सामन्यात भारत ‘अ’ चे नेतृत्व शिखर धवन करेल.

२२ ते २४ सप्टेंबर दरम्यान म्हैसूरमध्ये कर्नाटकच्या रणजी संघाविरुध्द बांगलादेश ‘अ’ संघाचा सामना होईल. उनमुक्त चांदने २०१२ मध्ये १९ वर्षाखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version