Home देश देशात ११,७५० शेतकरी, मजुरांच्या आत्महत्या

देशात ११,७५० शेतकरी, मजुरांच्या आत्महत्या

0

२०१४ मध्ये देशात विविध कारणांनी ५६५० शेतकरी आणि ६७५० शेतमजुरांनी आत्महत्या केल्याची स्पष्ट कबुली लोकसभेत सरकारने दिली.

नवी दिल्ली- देशातील शेतक-यांची अवस्था दिवसेंदिवस भयानक बनत चालली आहे. २०१४ मध्ये देशात विविध कारणांनी ५६५० शेतकरी आणि ६७५० शेतमजुरांनी आत्महत्या केल्याची स्पष्ट कबुली लोकसभेत सरकारने दिली.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाचा हवाला देऊन लोकसभेत लेखी प्रश्नांच्या उत्तरात बोलताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदारिया म्हणाले की, शेतकरी आत्महत्येसाठी मुख्य कारणे दिवाळखोरी, कर्जाचा डोंगर, शेतीशी संबंधित विषय नापिकी, नैसर्गिक आपत्तीने संकट, गरिबी, कौटुंबिक समस्या, आजारपण आदी आहेत.

शेतीशी संबंधित २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे १३७५४ व ११७७२ जणांनी आत्महत्या केल्या. २०१४ मध्ये शेतकरी व शेतमजूर असे दोन वर्ग केले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version