Home टॉप स्टोरी देशभरात बकरी ईद उत्साहात संपन्न

देशभरात बकरी ईद उत्साहात संपन्न

0

काश्मीरमधील किरकोळ हिंसाचार वगळता संपूर्ण देशात ईद शांततेत साजरी झाली. या निमित्त मुस्लिमांनी विविध ठिकाणी एकत्रितपणे नमाज अदा केला.
नवी दिल्ली- देशभरात ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाले. काश्मीरमधील किरकोळ हिंसाचार वगळता संपूर्ण देशात ईद शांततेत साजरी झाली. या निमित्त मुस्लिमांनी विविध ठिकाणी एकत्रितपणे नमाज अदा केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी सर्वांना ईद उल जुहानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईद उल जुहाच्या मुस्लीम बांधवाना ट्विटरहून शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद निमित्त अल्लाहच्या प्रती प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त करण्यासाठी ही ईद साजरी केली जाते. ईद उल जुहानिमित्त मुस्लिम बांधव नमाज पठणानंतर अल्लाहला बकरीची कुर्बानी देतात. यादिवशी अनेक मुस्लीम बांधव गरिबांना दान देतात.

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईद उल जुहा. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते.

आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईद उल जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी केला नमाज अदा

देशभरात बकरी ईद मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. काश्मीरमधील किरकोळ हिंसाचार वगळता संपूर्ण देशात ईद शांततेत साजरी झाली. या निमित्त मुस्लिमांनी विविध ठिकाणी एकत्रितपणे नमाज अदा केला. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
‘ईद-उल-अझा’ हा सण मुस्लिमांमध्ये त्यागाचा सण म्हणून साजरा केला जातो. राजधानी दिल्लीत जामा मशीद, फतेहपुरी तसेच सीलामपूर, जाफ्राबाद, सीमापुरी, मुस्ताफद आदी भागात मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. नातेवाईक व मित्र-मंडळींच्या घरी जाऊन मिठाईची देवाण-घेवाण केली. दिल्ली पोलिसांनी या सणानिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
लखनौमध्ये सिबतैनाबाद इमामबरा येथे शिया व सुन्नी यांनी एकत्रितपणे नमाज अदा केला. यावेळी शिया समाजाचे धर्मगुरू आणि अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष कलबे सादिक हेही उपस्थित होते. यापूर्वी दोन्ही पंथ भिन्न ठिकाणी नमाज पडत होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version