Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती देवपूजेविषयी विशिष्ट माहिती

देवपूजेविषयी विशिष्ट माहिती

0

देव्हा-यात एकाच देवतेच्या दोन-दोन, तीन-तीन मूर्ती नसाव्यात, फोटोसुद्धा डबल नसावेत.
>> घरातील देव्हा-यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये.
>> देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल. देव्हारा नियमितपणे स्वच्छ करावा, देव हे वस्त्रावर असावेत. आपल्या घरी देव्हा-यात कुलदेवतेची मूर्ती, प्रतिमा असावीच असावी. सर्वात मागे मध्यभागी कुलदेवता प्रतिमा आणि त्या समोर मध्यभागी गणपती व गणपतीच्या डाव्या बाजूस देवी मूर्ती म्हणजे लक्ष्मी / अन्नपूर्णा/दुर्गा इत्यादी आणि उजव्या बाजूस देव मूर्ती म्हणजे बाळकृष्ण इत्यादी..
देवघरात शंख असावा, पण तो छोटा पूजेचा शंख असावा,
>> वाजविण्याचा मोठा शंख देव्हा-यात ठेवू नये, बाजूला ठेवावा.
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला शंख असावा आणि देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस घंटी असावी..

>> पूजेचे साहित्य –
अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्वा, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर, वस्त्र, फळं, नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत
(दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)

>> वापरती भांडी
तांब्या, भांडे, (पंचपात्र), पळी, ताम्हण, अभिषेकपात्र, निरांजन, समई (विशेषप्रसंगी) घंटा.

>> पूजेचे साहित्य कसे असावे?
सर्व पूजेची भांडी तांब्या, पितळेची – शक्य तर चांदीची असावीत.
>> स्टेनलेस स्टीलची अथवा प्लास्टिकची नसावी.

>> गंध
चंदन उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुस-या तबकडीत घेऊन गंध लावावा. देवासाठी गंध हातावर उगाळू नये.

>> अक्षता –
धुतलेल्या अखंड तांदळांना थोडेसेच कुंकू लावून त्या अक्षता वाहाव्या.
>> शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
>> शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा, दुस-या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे.
हळद-कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर) पूजा साहित्यात असावा.
गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर) वाहण्याची वहिवाट आहे.

>> फुले
ऋतुकालोद्भव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
जाई, जुई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, वगैरे फुले सर्व देवांना चालतात.
>> विष्णूला – चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
>> शंकराला –  पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा, पांढरी फुले वाहतात.
>> गणपतीला – गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहतात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.
>> गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.
>> देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.

>> पाने –
विष्णू, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहतात.

>> धूप – देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
अगरबत्ती देव्हा-याच्या आत ठेवू नये, बाहेर बाजूला ठेवावी.

>> दीप – निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये.
समईत एक, दोन, पाच, सात अशा ज्योती (वाती) असाव्यात. तीन नसाव्यात.
देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस तुपाचा दिवा असावा आणि देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा असावा.
वाती या जोडवाती असाव्यात, म्हणजे दोन वाती एकत्र करून केलेली एक वात..

>> नैवेद्य – रोजच्या पूजेत देवाना पंचामृताचा नैवेद्य दाखवितात.
दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात.
>> विशेषप्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोब-याचा नैवेद्य,
>> देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.

>> फळे –
>> देवाला कच्ची फळे वाहू नयेत. पक्व फळांचे देठ देवाकडे करून ठेवावेत.

>> तांबूल –
म्हणजे विडय़ांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे.
पानाचे देठ देवाकडे करावेत. विडय़ावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
तसेच ड्रायफूट्र्ससुद्धा असल्यास उत्तम.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version