Home देश दिल्ली निवडणूक, नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

दिल्ली निवडणूक, नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

0

दिल्ली विधानभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांनी सकाळीच मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये हजेरी लावली.

नवी दिल्ली – दिल्ली विधानभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांनी सकाळीच मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये हजेरी लावली.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी सकाळीच मतदानाचे कर्तव्य बजावले. यावेळी या नेत्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहनही केले.

सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून नऊ वाजेपर्यंत दिल्लीत ५.६४ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास केजरीवाल यांनी बी.के.दत्त कॉलनी येथील मतदारकेंद्रात जाऊन मतदानाचे कर्तव्य बजावले. त्यापूर्वी ट्विटरवरुन त्यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मध्य दिल्लीतील निर्मला भवनमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तर राहुल गांधी यांनी औरंगजेब लेनमधील मतदानकेंद्रावर जाऊन मतदान केले.

किरण बेदी यांनी मालविया नगरमधील मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांनीही यावेळी मतदारांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.

‘आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. दिल्लीकरांना ठरवायचे आहे की त्यांना कोणत्याप्रकारची दिल्ली हवी आहे ते. स्वच्छ दिल्ली, सुरक्षित दिल्ली, सामर्थ्यशाली दिल्ली. जिथे महिलांचा सन्मान केला जाईल अशी दिल्ली. मी नागरिकांना आवाहन करते त्यांनी घराबाहेर पडावे आणि मतदान करावे’ असे बेदी म्हणाल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version