Home टॉप स्टोरी दिल्लीसाठी काही वेळ द्यावा, केजरीवालांची मागणी

दिल्लीसाठी काही वेळ द्यावा, केजरीवालांची मागणी

0

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांना दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची टीका मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीकेली आहे.

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांना दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. जाहीर पत्राद्वारे मोदींना दिल्लीसाठी एखादा तास तरी द्यावा अशी मागणी केजरीवालांनी केली आहे.

माझी तुम्हाला एक लहानशी विनंती आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यस्थेचा आढावा घेण्यासाठी तुम्ही एखादा तास दिल्लीला द्यावा अथवा आमच्याकडे दिल्ली पोलिसांचे नियंत्रण द्यावे असे केजरीवाल यांनी या पत्रात म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांचे नियंत्रण तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात त्यामुळे तुम्हाला येथे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

गेल्या आठवड्यात दिल्लीत १९ वर्षीय मुलीची क्रूरपणे हत्या करण्यात आली. शेजारच्यांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्याने तिला धारदार शस्त्राने भोसकण्यात आले.

या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की एखादा तास तु्म्ही दिल्लीला द्यावा. दिल्लीतील जनतेला भेटा नाहीतर आमच्या हातात पोलिसांचे नियंत्रण देण्यात यावे. जनतेच्या साथीने आम्ही दिल्ली पोलीस व्यवस्था ठीक करु असे केजरीवालांनी पत्रात नमूद केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version