Home महामुंबई दाभोलकरांच्या हत्येशी काहीही संबंध नाही

दाभोलकरांच्या हत्येशी काहीही संबंध नाही

1

डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या हत्येशी सनातन संस्थेचा काहीही संबध नसल्याचा खुलासा, सनातन संस्थेने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी केला.

मुंबई– अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद दाभोलकर यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद होते, वैयक्तिक नव्हते. त्यांच्या हत्येशी सनातन संस्थेचा काहीही संबध नसल्याचा खुलासा, सनातन संस्थेने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी केला.

[poll id=”372″]

दाभोलकरांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्याच्या हत्येने आम्हालाही धक्का बसला आहे. मात्र प्रसारमाध्यमे आणि काही पुरोगामी मंडळी सनातन संस्थेला दोषी ठरवत आहेत. ही बाब संस्थेची मानहानी करणारी असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी या वेळी सांगितले. डॉ. दाभोलकरांचा दुसरा गांधी करू, अशा आशयाचे कोणतेही विधान सनातन संस्थेच्या साधकाकडून करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

..तरीही आकस कायम

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्याविरोधात खदखदत असलेला आकस बुधवारी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. आठवले यांनी व्यक्त केला.

‘आजाराने अंथरुणाला खिळून मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना आलेला मृत्यू, ही ईश्वराने त्यांच्यावर केलेली कृपाच आहे’ असे चीड आणणारे विधान त्यांनी सनातनच्या संकेतस्थळावर टाकले आहे.

1 COMMENT

  1. Doctor Narendra Dabholkar yaanche baddal akher paryant sanaatan sansthene tirskarch dakhwila. Tathapi tyaancyaa maranoparaant vishesh lekhat aajari padun mrutyu yenya peksha asa mrutyu chaangalaa ase vidhan kele aahe.Janm-mrutyu he prarabdha aahe,asehi ek vidhan lekhat aahe.Yaatun marekaryaache chupe samarthanch hot naahi kay ? Nathuram Godse jyancha aadarsh asatil tyaanchyaa kadun vegali apekshaa thewane chukichech tharel !.
    Kishor Mogal,Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version