Home टॉप स्टोरी दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा

0

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफीज सईद आणि झकी उर रेहमान लख्वी या तिघांची संपत्ती जप्त करण्याची मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे.

नवी दिल्ली – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफीज सईद आणि झकी उर रेहमान लख्वी या तिघांची संपत्ती जप्त करण्याची मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अल कायदा आणि तालिबान प्रतिबंधित समितीच्या यादीत दाऊद, लष्कर ए-तोयबाचा संस्थापक सईद आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी यांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्राचा सदस्य असल्याने या तिघांची संपत्ती जप्त करणे पाकिस्तानची जबाबदारी आहे. या तीनही जणांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे की नाही याबाबतची विचारणा करणारे पत्र पाकिस्तानला पाठवण्यात येणार आहे. आणि त्यांची संपत्ती जप्त न झाल्यास त्यांची संपत्ती तात्काळ जप्त करण्याची मागणी करु असे सरकारी अधिका-याने सांगिते.

१९९३मधील बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा भारताने केला आहे. मात्र पाकिस्तानने ते नाकारले आहे. हाफीज सईद मोकाटपणे पाकिस्तानात फिरतोय तर गेल्या महिन्यात रावळपिंडी तुरुंगातून सुटका झालेला लख्वी पाकिस्तानात आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या प्रतिबंधित यादीत २००३ मध्ये दाऊदचा समावेश करण्यात आला. तर २००८ मध्ये लख्वी आणि सईदचा समावेश करण्यात आला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version