Home टॉप स्टोरी दाऊदला पकडण्यासाठी अमेरिकेची मदत

दाऊदला पकडण्यासाठी अमेरिकेची मदत

0

दाऊद इब्राहीमला पकडण्यासाठी अमेरिकेची मदत घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी सांगितले.
मुंबई– मुंबईतील १९९३मधील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहीमला पकडण्यासाठी अमेरिकेची मदत घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी सांगितले.

दाऊदला पकडण्यासाठी अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा एफबीआयशी आम्ही संपर्कात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दाऊदविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस याआधीच बजावण्यात आली आहे. दाऊदला पकडण्यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करावी यासाठीचा प्रस्ताव तयार केल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

दाऊद इब्राहीम सध्या पाकिस्तानमध्ये राहत असल्याचा दावा भारतीय गुप्तचर यंत्रणेने केला आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय तपास यंत्रणांनी अब्दुल करीम टुंडा आणि पुण्यासह देशातील अन्य शहरांमध्ये बॉम्बस्फोट करणा-या यासीन भटकळला अटक केली होती. या दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता भारताने दाऊदला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version