Home महामुंबई दलित हत्याकांडविरोधात एनजीओंचे उद्या आंदोलन

दलित हत्याकांडविरोधात एनजीओंचे उद्या आंदोलन

0

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी दलित हत्याकाडांच्या निषेधार्थ शहरातील स्वयंसेवी संस्था शनिवारी आंदोलन करणार आहेत.

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी दलित हत्याकाडांच्या निषेधार्थ शहरातील स्वयंसेवी संस्था शनिवारी आंदोलन करणार आहेत.

शिवाजी पार्क येथे होणा-या या आंदोलनात अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपट निर्माते एन. चंद्रा आणि गायिका फैय्याज हे कलाकारदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

दिवसेंदिवस दलित लोकांवरील अन्याय वाढतच आहे. त्यामुळे आजही लोक भितीच्या छायेत वावरत आहेत. आजही दलित, महिला आणि आदिवासी हे सांविधानिक अधिकारापासून वंचित आहेत. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही या लोकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय समाज हा विविध सांस्कृतिक धाग्यांनी बनला आहे. त्यामुळे सर्व जातींना एकत्रित ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत असे स्वयंसेवी संस्था चालवणारे काँग्रेसचे खासदार हुसैन दलवाई यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणातील आरोपींविरोधात तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच यांसारख्या प्रकरणांसाठी विशेष तपास समिती नेमण्यात यावी अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version