Home देश दक्षिण भारताला स्वाईन फ्ल्यूचा धोका

दक्षिण भारताला स्वाईन फ्ल्यूचा धोका

0
संग्रहित छायाचित्र

दक्षिण भारतात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, पुन्हा एकदा संपूर्ण देशात स्वाईन फ्ल्यूची दहशत निर्माण होण्याचा धोका आहे.

संग्रहित छायाचित्र

हैदराबाद – दक्षिण भारतात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, पुन्हा एकदा संपूर्ण देशात स्वाईन फ्ल्यूची दहशत निर्माण होण्याचा धोका आहे.

तेलंगणमध्ये स्वाईन फ्ल्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून, याच राज्यात स्वाईन फ्ल्यूने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हैदराबादच्या गांधी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूची बाधा झालेल्या २७ रुग्णांवर उपचार सुरु असून, मंगळवारी आणखी चार रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

स्वाईन फ्ल्यूची बाधा झाल्याचा संशय असलेल्या आणखी ३५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात दहा लहान मुलांचा समावेश आहे. तेलंगणमध्ये एक जानेवारी २०१५ ते २० जानेवारी २०१५ या कालावधील आतापर्यंत १५० जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असून, यात सात जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version