Home ताज्या घडामोडी थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा

थाटात पार पडला प्रियांकाचा साखरपुडा

0

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन प्रियकर, गायक निक जोनास यांचा साखरपुडा प्रियांकाच्या राहत्या घरी कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबई- गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन प्रियकर, गायक निक जोनास यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईत प्रियांकाच्या राहत्या घरी कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. त्या दोघांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे भाष्य केले नव्हते, पण आता लग्नाचे काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत आहे.

साखरपुडय़ानंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ‘रोका’ कार्यक्रमासाठी निकचे कुटुंबीयही उपस्थित होते. तसेच दोघांच्या हातातल्या डायमंड रिंगचीही चर्चा जोरात आहे. शनिवारी मुंबईत प्रियांकाच्या राहत्या घरी एका पूजेचे आयोजन केले होते. त्यात निक जोनास त्याच्या कुटुंबीयांसह उपस्थित होता.

गेल्या महिन्यात प्रियांकाच्या वाढदिवसाच्याच दिवशी निकने तिला प्रपोज केले होते. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा इव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदारासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता प्रियांकाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तिने आपली भावना मनात न ठेवता सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स, कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे प्रियांकाने त्यांच्या नात्याविषयी कधीच खुलेपणाने भाष्य केले नाही. मात्र वर्षाच्या अखेरपर्यंत हे दोघे लग्नबंधनात अडकतील, असेच अनेकांना वाटत आहे. आता सगळ्यांच्या मनातील ही गोष्ट प्रत्यक्षात कधी घडणार याकडेच सा-यांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.

चित्रपटसृष्टीतून आलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने घातलेल्या अंगठीची किंमत तब्बल २०० हजार डॉलर आहे. म्हणजे भारतीय किंमत १.५ कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. एका आंतरराष्ट्रीय जेमोलोजिस्टनुसार, ही ५ कॅरेटची अंगठी आहे. अंगठीमध्ये असलेल्या हि-याला कुशन कट डायमंड म्हटले जाते. हा हिरा सर्वात महागडा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version