Home टॉप स्टोरी तोमर यांची ‘आप’मधून हकालपट्टी ?

तोमर यांची ‘आप’मधून हकालपट्टी ?

0

लवकरच आम आदमी पक्षातून जितेंद्र सिंग तोमर यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली – बनावट पदवीप्रकरणात दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. लवकरच आम आदमी पक्षातून त्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत तोमर यांना आपचा पाठिंबा होता. मात्र पदवी प्रकरणात तोमर यांनी आपच्या नेत्यांना अंधारात ठेवल्याने तोमर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण अंतर्गत लोकपालांकडे सोपवण्यात येण्याची शक्यता असून तेच याबाबतचा निर्णय घेतील.

तोमर यांच्या कायदे पदवीबाबत कोणताही वाद नाही मात्र त्यांच्या पदवीबाबत नक्कीच शंका आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही तोमर यांच्यावर नाराज आहेत. आतापर्यंत तोमर यांच्यावर केवळ आरोप केले जात होते. मात्र हे आरोप खोटे ठरवण्यात ते असमर्थ ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तोमर हे सध्या बनावट पदवी प्रकरणी पोलीस कोठडीत आहेत. तोमर यांनी अटकेच्या विरोधात दाखल केलेला जामीन अर्ज गुरुवारी दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version