Home Uncategorized ‘तेलाच्या किमती वाढल्यास उत्पादन शुल्काचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवू’

‘तेलाच्या किमती वाढल्यास उत्पादन शुल्काचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवू’

0

तेलाच्या किमती वाढल्यास तेलाच्या कोसळलेल्या दरांचा फायदा ग्राहकांकडे पास ऑन करू, असे आश्वासन सरकारने सोमवारी दिले.

नवी दिल्ली – तेलाच्या किमती वाढल्यास तेलाच्या कोसळलेल्या दरांचा फायदा ग्राहकांकडे पास ऑन करू, असे आश्वासन सरकारने सोमवारी दिले. त्याचवेळेस तेल जागतिक बाजारपेठेत स्वस्त झाले असतानाही अबकारी शुल्क वाढवून त्याचा फायदा ग्राहकांना न देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थनही पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी केले.

कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली तर उत्पादन शुल्काचा फायदा ग्राहकांपर्यत पोहोचवला जाईल, असे मी आश्वासन सभागृहाला देत असल्याचे प्रधान म्हणाले. पेट्रोल व डिझेलवरील नियंत्रणे हटवल्यानंतर किमतीबाबतचे निर्णय तेल कंपन्याच घेत आहेत. परंतु कधीही तेलाच्या किमती जागतिक बाजारात वाढल्या तर पेचप्रसंगाच्या दिवसात ग्राहकांना फायदा देण्यासाठी सरकारकडे बचावाचे साधन हवे, असे प्रधान म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version