Home देश ‘तेजस’वर दगडफेक

‘तेजस’वर दगडफेक

0

दिल्लीतून मुंबईत येत असताना ही घटना घडल्याचे समजते. तेजस एक्सप्रेस मुंबई ते गोवा या मार्गावर धावणार आहे.

नवी दिल्ली – मुंबई- गोवा मार्गावर धावणा-या तेजस या बहुर्चित एक्सप्रेसला उद्घाटनापूर्वीच समाजकंटकाचा सामना करावा लागला. या एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली असून या दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. दिल्लीतून मुंबईत येत असताना ही घटना घडल्याचे समजते. तेजस एक्सप्रेस मुंबई ते गोवा या मार्गावर धावणार आहे. ताशी २०० किलोमीटर या वेगाने धावू शकणारी ही एक्सप्रेस सोमवारी २२ मे पासून ग्राहकांसाठी खुली होणार होती. या रेल्वेमध्ये चित्रपट पाहण्यासाठी एलसीडी स्क्रीन, स्वयंचलित दरवाजे, दोन डब्यांना जोडणारा चांगला मार्ग अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

विमानातील बिझनेस क्लाससारख्या आरामदायी सीट, पाण्याचा नळ, रेल्वे कर्मचा-याला बोलावण्यासाठी बटण अशा सुविधाही आहेत. याशिवाय स्वच्छतागृहेही उत्तम दजार्ची असून ‘तेजस’मुळे रेल्वेची प्रतिमा बदलण्यात हातभार लागणार आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये आठवडय़ातील तीन दिवस, तर अन्य महिन्यांत आठवडय़ातील पाच दिवस ‘तेजस’ने मुंबई-गोवा प्रवास करता येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version