Home टॉप स्टोरी तीन संशयित दहशतवादी अटकेत

तीन संशयित दहशतवादी अटकेत

0

पाच राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत मुंब्रा, जालंधर आणि बिजनौरमधून तीन संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत मुंब्रा, जालंधर आणि बिजनौरमधून तीन संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे सदस्य देशाच्या विविध भागात सक्रिय असून त्यांच्यात काहीतरी कट शिजत असल्याची माहिती उत्तर प्रदेशमधल्या दहशतवादविरोधी पथकाला खब-यांकडून मिळताच या माहितीच्या आधारे त्यांनी पाच राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला.

त्यानंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, आंध्र प्रदेशचा क्राइम इन्वेस्टिगेशन सेल, महाराष्ट्र एटीएस, पंजाब पोलीस आणि बिहार पोलीस या सगळ्यांशी समन्वय साधला. देशभरात सुमारे महिनाभर शोधमोहीम राबवल्यानंतर गुरुवारी या पोलिसांनी धडक कारवाई केली.

त्यात मुंब्र्यातून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तर जालंधर आणि बिजनौर पोलिसांनीही दोन संशयिताना अटक केली आहे. तर पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ते नेमके कोणत्या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.  मात्र त्यांच्या अटकेमुळे देशात मोठा घातपात घडवण्याचा कट पोलिसांनी उधळला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version