Home व्यक्तिविशेष डॉ. मोहन महादेव आगाशे

डॉ. मोहन महादेव आगाशे

0

डॉ. मोहन महादेव आगाशे. ससून हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ म्हणजेच मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आजचे आघाडीचे अभिनेते, फिल्म इन्स्टिटय़ूट, पुणेचे संचालक डॉ. मोहन आगाशे यांचा आज जन्मदिन. दि. २३ जुलै १९४७ रोजी भोर या पुणे जिल्ह्यातील गावी त्यांचा जन्म झाला. एम.डी. (मनोविकारशास्त्र) डी.पी.एस. असलेल्या मोहन यांनी वैद्यकीय व नाटय़व्यवसाय ही दोन्ही क्षेत्रे समर्थपणे सांभाळली. दोन्ही क्षेत्रांत तितकाच लौकिक मिळवला. आपल्या अभिनय सामर्थ्यांच्या जोरावर पेशवाईतील नाना फडणवीस साकारणारा हा दिग्गज कलावंत. आपल्या खोचक वाणीने आणि खिळवून टाकणा-या अभिनयाने मोहन आगाशेंनी नाना फडणवीस साकारला आणि जाणकार रसिकांची वाहवा मिळविली. जब्बार पटेलांच्या ‘एक होता विदूषक’ मध्ये रमलेल्या या कलावंताने हिंदी चित्रपटसृष्टीतही खलनायक म्हणून उत्तम जम बसविला आहे. ‘कथा दोन गणपतरावांची’ या गाजलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत दिलीप प्रभावळकरांसारख्या कसलेल्या अभिनेत्याशी आपल्या खणखणीत अभिनयाच्या बळावर कडवी झुंज देणारा हा बुजुर्ग अभिनेता. आज त्यांचा जन्मदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version