Home देश डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ

डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ

0

डिझेलच्या किंमतीत सोमवारी प्रति लिटर एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – सरकारने सोमवारी संध्याकाळी  डिझेलच्या दरात  प्रति लिटर एक रुपयाने वाढ केली असून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिझेलचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.

स्थानिक कर आणि व्हॅटचा या दरवाढीमध्ये समावेश नाही. त्यामुळे प्रत्येक शहरानुसार डिझेलचे दर वेगवेगळे असणार आहेत. सध्या मुंबईत प्रतिलिटर डिझेलचा दर ६३.८६ आहे. नव्या दरानुसार डिझेल ६५.२१ रुपयांना मिळणार आहे.

याआधी लोकसभा निवडणुकादरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल पुरवठा करणा-या कंपन्यांना दर वाढवण्यास मनाई केली हेती. जून २०१०मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रण मुक्त केल्यापासून दर १५ दिवसांनी सुधारीत दर जाहीर केले जातात. मात्र यावेळी सरकारने ही दरवाढ रोखली होती.

याआधी एकच महिन्यात दोन वेळा पेट्रेलच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. एक एप्रिल रोजी ७५ पैशांनी तर १६ एप्रिल रोजी ७० पैशांनी पेट्रेलच्या दरात कपात करण्यात आली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version