Home महामुंबई ठाणे ठाण्यात चार लाख मतदारांची नावे यादीतून वगळली

ठाण्यात चार लाख मतदारांची नावे यादीतून वगळली

0

ठाणे जिल्ह्यात मतदारयादीतून नावे वगळण्याच्या कामाला वेग आला आहे. 

ठाणे – ठाणे जिल्ह्यात मतदारयादीतून नावे वगळण्याच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यातील चोवीस मतदारसंघात ७२ लाख मतदार आहेत. यातील चार लाख ५३ हजार ३०० मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे बोगस मतदानावर अंकुश ठेवणे सोपे होणार आहे.

आजघडीला जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख आहे. मतदारांची संख्या ७२ लाख ४४ हजार आहे. तर या यादीच्या परिपूर्णतेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मृत तसेच स्थलांतरीत झालेल्या मतदारांचा देखील या यादीत समावेश होता. याचा फायदा बोगस मतदान करणा-यांनाकडून घेतला जातो, अशा घटनाही उघडकीस आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत नव्याने मतदारयाद्या तयार करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार विधानसभानिहाय याद्या बनवण्यात आल्या आहेत. तसेच याद्या प्रसिद्ध करून हरकती देखील मागवण्यात आल्या. आतापर्यंत एक हजार हरकती प्राप्त झाल्या असून सर्वाधिक हरकती या भिवंडी तालुक्यातून प्राप्त झाल्या आहेत. चार लाख ५३ हजार ३०० हजार मतदारांचा ठावठिकाणा उपलब्ध न झाल्याने त्यांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात आली आहेत.

मतदार नोंदणीलाठी सप्टेंबरमध्ये मोहीम राबवली जाणार आहे. नावे वगळण्यात आलेल्या मतदारांनी आपल्या वास्तव्याचा पुरावा सादर केला. तर त्यांचे नाव पुन्हा मतदारयादीत समावून घेतले जाईल. – माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version