Home महामुंबई ठाणे ठाणे, कळवा स्थानकांत अफवेचा बॉम्ब

ठाणे, कळवा स्थानकांत अफवेचा बॉम्ब

0

कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या मुंबई नियंत्रण कक्षातून आलेल्या फोनने ठाणे पोलिसांची शनिवारी चांगलीच धावपळ उडाली.

ठाणे – कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या मुंबई नियंत्रण कक्षातून आलेल्या फोनने ठाणे पोलिसांची शनिवारी चांगलीच धावपळ उडाली. मात्र स्टेशन परिसर पूर्णपणे पिंजून काढल्यानंतरही हाती काहीच न लागल्याने ही अफवाच ठरली.

ठाणे पोलिसांना फोन आल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी साडेचार पर्यंत दोन्ही स्थानकात शोधमोहीम केली. मात्र हाती काहीच सापडले नाही. सकाळपासून रेल्वे प्रशासन व पोलिसांनी कडक सुरक्षा ठेवल्याने नेमके काय होत आहे. याची भीती प्रवाशांत होती.

ठाणे, कळवा रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याची सूचना नियंत्रण कक्षातून रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करण्यासाठी धावपळ केली. याच दरम्यान घाटकोपर येथून रेल्वे पोलिसांचे एक पथक ठाणे स्थानकात आले. त्यांनी ठाणे रेल्वे पोलिसांबरोबर शोध सुरू केला. तर नौपाडा पोलिसांनी सॅटिस व स्टेशन बाहेरील परिसर पिंजून काढला. कोपरी पोलिसांनी स्थानक परिसरातील त्यांच्या हद्दीत शोध सुरू केला. बॉम्बशोधक पथकाकडून सर्व स्थानकांची व वाहनांची तपासणी करण्यात आली. कळवा स्थानकातही शोधकार्य घेण्यात आले. सात तास ही शोध मोहीम सुरू होती. पण पोलिसांच्या हाताला काहीच लागले नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version