Home टॉप स्टोरी १९९३ मुंबई बॉम्बस्फोट, टाडा न्यायालयातील घटनाक्रम

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट, टाडा न्यायालयातील घटनाक्रम

0

मुंबईतील १९९३ मध्ये १२ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या सुनावणीमध्ये टाडा न्यायालयाची भूमिका महत्वाची होती. टाडा न्यायालयातील सुनावणीचा घटनाक्रम पुढील प्रमाणे –

 

>चार नोव्हेंबर १९९३ – अभिनेता संजय दत्तसह पकडण्यात आलेल्या सर्व १८९  आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

>१९ नोव्हेंबर – प्रकरणाची सुत्रे सीबीआयकडे सूपूर्द करण्यात आली

>एक एप्रिल १९९४ – टाडा न्यायालयाचे सिव्हिल न्यायालयातून आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात स्थानांतरण

>१० एप्रिल १९९४ – २६ जणांची निर्दोष मुक्तता, इतर १६३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने सपाचे अबू आझमी आणि अमजद मेहेर या दोन जणांची निर्दोष मुक्तता केली.

>१९ एप्रिल १९९५ – अभिनेता संजय दत्तला अटक

>एप्रिल ते जून १९९५ – सर्व दोषींवर आरोपपत्र दाखल

>३० जून १९९५ – अटक केलेल्या आरोंपींपैकी मोहम्मद जमील आणि उस्मान झनकानन यांना माफीचा साक्षीदार करण्यात आले.

>१४ ऑक्टोबर १९९५ – अभिनेता संजय दत्तला (कैदी नंबर ११७) सर्वोच्च न्यायालयाचा जामीन मंजूर

>२३ मार्च १९९६ – टाडा न्यायालयाचे न्यायाधीश जे.एन.पटेल यांची उच्च न्यायालयात नियुक्ती

>२९ मार्च १९९५ – पी.डी.कोडे यांची विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

>ऑक्टोबर २००० – ६८४ साक्षीदारांचे जबाब तपासणी पूर्ण

>नऊ मार्च ते १८ ऑक्टोबर २००१ – न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारावर खटल्याच्या प्रत्यक्ष दावे प्रतिदाव्याला सुरुवात

>नऊ नोव्हेंबर २००१ ते २२ ऑगस्ट २००२ – बचाव पक्षाला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.

>२० फेब्रुवारी २००३ – दाऊदच्या टोळीतील सदस्य इजाज पठाणला न्यायालयात हजर करण्यात आले

>२० मार्च २००३ – मुस्तफा डोसावरील न्यायालयीन चौकशीला सुरुवात

>सप्टेंबर २००३ – न्यायालयीन चौकशी समाप्त आणि निर्णयाची प्रतिक्षा सुरु

>१३ जून २००६ – अबू सालेमच्या न्यायलयीन चौकशी सुरु

>१० ऑगस्ट २००६ – न्यायाधीश पी.के.कोडे यांनी निर्णय १२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढककला

>१२ सप्टेंबर २००६ – खटल्याच्या निर्णय देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, मेमन कुटुंबातील चार सदस्य दोषी, तिघांची सुटका, १२ दोषींना मृत्यूदंड तर इतर २० जणांना जन्मठेप

>एक नोव्हेंबर २०११- १०० दोषींबरोबरच राज्याने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस सुरुवात

>२९ ऑगस्ट २०१२- याचिकांवरील सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

>२१ मार्च २०१३– प्रमुख आरोपी टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब आणि १० दोषींची फाशीची शिक्षा कमी करून त्याचे रुपांतर जन्मठेपेत, १८ पैकी १६ जणांच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब

 

[EPSB]

याकूब मेमनला फाशीच ! »

मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.…

 

 

संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा »

मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version