Home Uncategorized टाटा मोटर्सला ५,३९८.२१ कोटींचा नफा

टाटा मोटर्सला ५,३९८.२१ कोटींचा नफा

0

जग्वार लँडरोव्हरच्या विक्रीतील वाढीच्या जोरावर देशातील आघाडीची वाहन उत्पादक टाटा मोटर्सने ३० जून २०१४ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित ५,३९८.२१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
मुंबई– जग्वार लँडरोव्हरच्या विक्रीतील वाढीच्या जोरावर देशातील आघाडीची वाहन उत्पादक टाटा मोटर्सने ३० जून २०१४ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित ५,३९८.२१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात जवळपास तिप्पट वाढ नोंदवली झाली असून ही नऊ तिमाहींतील सरस कामगिरी ठरली. गेल्या वर्षी  १७२६.०७ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

टाटा मोटर्सने एप्रिल-जून या कालावधीत ६४,१५०.७४ कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद केली. आधीच्या वर्षीच्या तुलनेत विक्री महसुलात ३७.१८ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या महसूल कामगिरीत ब्रिटिश उपकंपनी जग्वार लँडरोव्हरचा सिंहाचा वाटा राहिला. पहिल्या तिमाहीत या कंपनीने ५३.८९ टक्क्यांच्या वाढीसह ५४,४२५.९७ कोटी रुपयांची विक्री नोंदवली. दरम्यान, टाटा आणि इतर ब्रँडखालील वाहनांची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यांच्या विक्रीत ११.३३ टक्के घट झाली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version