Home Uncategorized टाटा मोटर्सकडून स्वेच्छा निवृतीचा प्रस्ताव

टाटा मोटर्सकडून स्वेच्छा निवृतीचा प्रस्ताव

0

टाटा मोटर्सने काही विभागांतील कर्मचा-यांसमोर स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय समोर ठेवला आहे.
नवी दिल्ली- मंदीने विक्रीला मोठा फटका बसला असून मासिक खर्च आणि कर्मचा-यांचे वेतन यांची जुळवाजुळव करताना वाहन उत्पादक कंपन्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी टाटा मोटर्सने काही विभागांतील कर्मचा-यांसमोर स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय समोर ठेवला आहे.

संपूर्ण वाहन क्षेत्रालाच मंदीने दीर्घकाळापासून ग्रासले आहे, त्यामुळे या परिस्थितीत काटकसर करण्यास भाग पाडल्याचे टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लीम यांनी सांगितले.

स्वेच्छा निवृत्तीच्या प्रस्तावाला काही कर्मचा-यांनी प्रतिसाद दिला असल्याचे ते म्हणाले. याआधी हिंदुजा समूहातील अशोक लेलँडनेही कर्मचा-यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय दिला होता. ३१ डिसेंबपर्यंत स्वेच्छा निवृत्ती घेणा-या कर्मचा-यांसाठी कंपनीने ४३.५८ कोटी खर्च केले. टाटा मोटर्सकडून मार्चमध्ये ट्रक रेसिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version