Home महामुंबई ‘जेईई मेन’चा निकाल जाहीर

‘जेईई मेन’चा निकाल जाहीर

0

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसइ) घेण्यात आलेल्या ‘जेईई मेन-२०१३’ या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला.

मुंबई- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसइ) घेण्यात आलेल्या ‘जेईई मेन-२०१३’ या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. यात ‘पेपरबेस’ परीक्षा ७ एप्रिल तर ’ऑनलाईन’ची परीक्षा ८ ते ३० एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. या दोन्ही पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून १० लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल सीबीएसइच्या http://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ची परीक्षा २ जून रोजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ‘जेईई मेन’ या परीक्षेतील पहिल्या दीड लाख गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, हवाईदल, अभियांत्रिकी-भौतिकशास्त्र, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आदी तब्बल १३ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. यासाठी आयआयटीकडून घेण्यात येणारी ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा २ जून रोजी घेण्यात येणार आहे.

यासाठीची प्रवेश प्रक्रिया ८ मे पासून http://jeeadv.iitd.ac.in आणि http://jeeadvonline.iitd.ac.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असून, यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १ हजार ८०० व अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी ९०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. मात्र महिला उमेदवारांसाठी नोंदणी मोफत असेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version